भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू; पुनर्विकासाचा वादात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच

भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू; पुनर्विकासाचा वादात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच


मुंबई :भायखळा येथील धोकादायक इमारतीतील शौचालय कोसळून 12 वर्षाच्या मुलीसह 70 वर्षी वृध्देचा मृत्यू झाला आहे.महानगर पालिकेने ही इमारती धोकादायक म्हणून जाहीर करुन तशी लिखीत माहिती म्हाडाला दिली होती.अशी माहिती पुढे आली आहे.पुनर्विकासाचा वादात ही इमारत रखडली होती.

भायखळा येथील आयेशा कंपाऊड मधील ही दोन मजली जीर्ण झालेली इमारत आहे.या इमारतीच्या कॉमन टॉयलेटचा भाग कोसळून काही जणं गाडले गेल्याची घटना आज सकाळी घडली होती.यात,गंभीर जखमी असलेल्या आलिया कुरेशी (12) या मुलीसह नुर कुरेशी (70) या वृध्देचा मृत्यू झाला आहे.

फोर्ट येथे पुनर्विकासाच्या वादात अडकलेली इमारत कोसळून काही दिवसांपुर्वीच 10 जणांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर या आज दुर्घटना घडलेल्या मिश्रा इमारतीच्या पुनर्विकासावरुन वाद सुरु होता.गेल्या सहा वर्षांपासून या इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे.ही म्हाडाची इमारत असून महानगर पालिकेने इमारत धोकादायक असल्याने म्हाडाला त्याबाबतची लिखीत माहितीही दिली होती.तसेच,इमारतीलाही नोटीस बजावली होती.अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
 

इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली.शेख यांनी दुर्घटना स्थळाची पाहाणी करुन मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून अधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

रहिवाशांचे स्थालांतर 

याा इमारतीतील रहिवाशांचे स्थालांतर तात्परत्या स्वरुपात करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर चर्चा करु.आठवडा भरात ही प्रक्रीया पुर्ण करु असेही शेख यांनी सांगितले.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com