esakal | ...अन्‌ बुरख्यात निघाला प्रियकर!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

ठाणे स्थानकात पोलिसांच्या तपासणीत झाले उघड; दोन बुरखाधारी ताब्यात

...अन्‌ बुरख्यात निघाला प्रियकर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वत्र दही हंडी उत्सवाची धामधुम सुरू असताना ठाणे रेल्वे स्थानकात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या दोन बुरखाधारी व्यक्तींना ठाणे लोहमार्ग पालिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. 23) रात्री सव्वा दहाच्या सुमारास स्थानकात घडली. गस्तीवरील पोलिसांनी दोन्ही व्यक्तींची तपासणी केली असता दोनपैकी एक बुरखाधारी चक्क पुरुष असल्याचे समोर आले. त्यामुळे, सतर्क झालेल्या पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले.

तेव्हा, बुरखा परिधान करून एक तरूणी आपल्या अल्पवयीन प्रियकरालाही बुरख्यात दडवून घरातून पळून आल्याचे समजले. दोघेही प्रेमी युगल उल्हासनगरचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता ढाकणे करीत आहेत.  

loading image
go to top