Mumbai News : ड्रेनेज लेनची सफाई करताना गोवंडीत दोन कामगारांचा मृत्यू

ड्रेनेज लेन मधील विषारी वायूमुळे दोघेही गुदमरले.
Two laborers died in Govandi while cleaning drainage lane mumbai
Two laborers died in Govandi while cleaning drainage lane mumbaisakal

मुंबई - मुंबईत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शिवाजी नगर, गोवंडी येथील ड्रेनेज लेन जाम झाल्याने सफाई करण्यासाठी दोन कामगार उतरले होते. मात्र ड्रेनेज लेन मधील विषारी वायूमुळे गुदमरुन आज दोघांचा मृत्यू झाला.

Two laborers died in Govandi while cleaning drainage lane mumbai
Mumbai Crime : पैसे कमविण्यासाठी मुंबईत घातपाताची धमकी; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

या प्रकरणाची शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, दोघेही खाजगी सफाई कामगार असल्याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले. गोवंडी, शिवाजी नगर, ९० फिट रोड क्रमांक १०, नवीन बस डेपो जवळील ड्रेनेज लेन पावसाचे पाणी साचल्याने जाम झाल्याने ते साफ करण्यासाठी दोन्ही कामगार शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता ड्रेनेज लेन मध्ये उतरले. मात्र ड्रेनेज लेन मधील विषारी वायूमुळे दोघेही गुदमरले.

Two laborers died in Govandi while cleaning drainage lane mumbai
Mumbai Rain Update : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा लुटला आनंद; तर नोकरी व कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांची उडाली तारांबळ

मुंबई अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. या दोघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी नंतर डॉक्टरांनी या दोघांनाही मृत झाल्याचे घोषित केलयाचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत. सुधीर महेंद्र दास (३०), राम कृष्ण (२५) ही मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com