'त्या' दोघांनी तोडला होम क्वारंटाईन! आता जबर कारवाई होणार

'त्या' दोघांनी तोडला होम क्वारंटाईन! आता जबर कारवाई होणार

नवी मुंबई : दुबईहुन नवी मुंबईत आलेल्या एका दाम्पत्याने होम क्वारंटाईनच्या सूचनांचे पालन न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानपाडा पोलीस ठाण्यात नवी मुंबईतील पहिला गुन्हा एका महिलेवर दाखल करण्यात आला आहे. सानपाडा सेक्टर 13 मध्ये राहणारे एक दाम्पत्य 17 मार्चला दुबईहून नवी मुंबईत आल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाला मिळाली होती.

सद्या कोरोना विषाणूंचा वाढते प्रमाण लक्षात घेत महापालिका आरोग्य विभागाने या दाम्पत्याला राहत्या घरात होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्या दाम्पत्याचे रोज तपासणी आणि फोनवरून विचारपूस केली जात होती. पण सोमवारी, 23 मार्चला आरोग्य विभागातील डॉक्टरने दाम्पत्या घरी फोन करून दोघेही घरी असल्याबाबत विचारणा केली. तेव्हा पतीने आपण दोघेही घरी असल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांनी इमारती मधील आणखीन एका इसमाकडे चौकशी केली असता. महिला गृहिणी घराबाहेर पडल्याची माहिती मिळाली. यावरून आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी त्या दाम्पत्याच्या घरी भेट दिली असता पती-पत्नी पैकी पत्नी नसल्याचे दिसून आले. चौकशी केली असता त्या मुंबईतील आपल्या मुलाच्या घरी गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे संशयित असतानाही सरकारच्या साथ नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 च्या 188 आणि 270 अन्वये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिवूडस मध्ये राहत असणाऱ्या एक 24 वर्षीय तरुणाला पालिकेच्या डॉक्टरांनी घराबाहेर न फिरण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण तरी देखील त्याने उल्लंघन करीत मित्रांकडे डोंबिवलीमध्ये गेल्यामुळे त्याच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Two men charged with breaking a home quarantine
Action will be taken in accordance with section 188

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com