TRP स्कॅम : हंसा कंपनीच्या आणखी दोन माजी कर्मचाऱ्यांना अटक 

अनिश पाटील
Tuesday, 20 October 2020

फेक टीआरपीप्रकरणी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.

मुंबई, ता.20 : फेक टीआरपीप्रकरणी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. दरम्यान रिपब्लिक वाहिनीच्या तीन अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने समन्स पाठवले असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आहे आहे.

दिनेश विश्वकर्मा ( वय 37 वर्षे ) आणि रामजी वर्मा (वय 44 ) अशी अटक केलेल्या  आरोपींची नावे आहेत. दोघेही हंसाचे माजी कर्मचारी आहेत. या दोघांवर टीआरपी वाढवण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला अटक केली होती. तो देखील ‘हंसा’चा माजी कर्मचारी असून त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाने (सीआययू) विरार येथून अटक केली होती.

महत्त्वाची बातमी : आता N95 मास्क मिळणार 19 ते 49 रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीन पदरी मास्क 4 रुपयांना

टीआरपी प्रकरणी आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी ( वय 21 वर्ष ), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (वय 44 वर्ष ), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा ( वय 47 वर्ष ), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी ( वय 44 वर्ष ) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. मिश्रा याच्या अटकेनंतर पोलिसांकडून आता दिनेश विश्वकर्मा, रॉकी व अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.  

महत्त्वाची बातमी : शिवसेनेचा क्रमांक घसरला, राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगतीपुस्तकात कोण अव्वल ?

संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची आणि व्यवहारांची तपासणी होणार आहे. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या यांची नावे याप्रकरणी आली आहे. याशिवाय आणखी वाहिन्यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण त्याबाबत अद्याप ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी स्कॅम प्रकरणात 40 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत.

( संपादन - सुमित बागुल )

two more ex employees of hansa company arrested by mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more ex employees of hansa company arrested by mumbai police