आठवडाभरात दोन एनएमएमटी बसचालकांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

टेम्पोचालकाने व त्याच्या सहकाऱ्याने सानपाडा बस स्थानकाजवळ एनएमएमटीप्रभावी बसचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. १) रात्री घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी टेम्पोचालकासह त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करून, त्यांचा शोध सुरू केला आहे.

नवी मुंबई : टेम्पोचालकाने व त्याच्या सहकाऱ्याने सानपाडा बस स्थानकाजवळ एनएमएमटीप्रभावी बसचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. १) रात्री घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी टेम्पोचालकासह त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करून, त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, गत आठवड्याच याच ठिकाणी एनएमएमटी बसचालकाला मारहाण झाली होती. 

ही बातमी वाचली का? या जिल्ह्याता माशीमार पक्षी चोहीकडे...

तक्रारदार बस चालक संतोष सकपाळ (५८) हे शनिवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास, सानपाडा स्थानकातून तुर्भे स्थानकात बस रिकामी घेऊन जात होते. यावेळी स्थानकातून बाहेर पडताना, पुढे उभ्या असलेल्या टेम्पोचालकाला सकपाळ यांनी टेम्पो पुढे घेण्यास सांगितले. या गोष्टीचा त्याला राग आल्याने सहकाऱ्यासह त्याने बसमध्ये घुसून बसचालक सकपाळ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर दोघांनी आपला टेम्पो घेऊन पलायन केले. या घटनेनंतर सकपाळ यांनी सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पोचालक व त्याच्या सहकाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

ही बातमी वाचली का? तानाजींच्या कर्मभूमीची असुविधांमुळे उपेक्षा

एनएमएमटी व्यवस्थापकांचे आयुक्तांना पत्र
गत आठवड्यातदेखील (ता. २३) सानपाडा स्थानकाजवळ स्कुटीवरून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने किरकोळ कारणावरून एनएमएमटीचालकाला मारहाण केली होती. या मारहाणीत चालक ज्योतीराम निळकंठ वडजेंना (३२) गंभीर दुखापत होऊन, ते जखमी झाले होते. याबाबत व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून एनएमएमटी बसचालक व वाहकांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two NMMT bus drivers beat up during the week