कोरोना आला मुंबईत ! मुंबईतील दोघांना कोरोनाची लागण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

मुंबई - जगभरात थैमान घातलेला घातक कोरोना व्हायरस आता मुंबईत येऊन ठेपलाय. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ वर गेलीये. कालच पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. या दाम्पत्यासोबत त्यांची मुलगी ड्रॉयव्हर आणि आणखी एका सहप्रवाशाला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 

दरम्यान याच दाम्पत्यासोबत दुबईला गेलेल्या आणखी दोघांना कोरोना झाल्याचं आता समोर आता समोर येतंय. हे दोहेही नागरिक मुंबईतील आहेत. या दोघा रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात आलाय. मुंबईत आज एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. 

मोठी बातमी - जोतिरादित्य शिंदेंच्या राजीनामन्यानंतर मुंबईतील 'हा' मोठा नेता देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी ?

आरोग्य विभागाने एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ वर गेलीये.   

दरम्यान मुंबई कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील किशोरी पेडणेकर यांनी केलंय. 

two people from mumbai tested positive in corona test

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two people from mumbai tested positive in corona test