esakal | उल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

Two postal articles books published in Ulhasnagar

हार-प्रहाराला कडू-डोसच्या लाभलेल्या साथीने लेखसंग्रहाचा एक नवा आणि उत्कंठावर्धक पायंडा रचला गेल्याचा सूर साहित्य क्षेत्रात उमटू लागला आहे. 

उल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील लेखसंग्रहाचे प्रकाशन उल्हासनगरात संपन्न झाले आहे. हार-प्रहाराला कडू-डोसच्या लाभलेल्या साथीने लेखसंग्रहाचा एक नवा आणि उत्कंठावर्धक पायंडा रचला गेल्याचा सूर साहित्य क्षेत्रात उमटू लागला आहे. 

प्रसिद्धी माध्यमांना निर्भीड, निस्वार्थ व निष्पक्ष पत्रकारांची गरज आहे. उल्हासनगर सारख्या शहरात हार प्रहार व कडुडोस या दोन लेखसंग्रहांचे एकाच दिवशी प्रकाशन होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार दै. जनशक्तीचे वृत्त संपादक राजा आदाटे यांनी लेखसंग्रहाच्या प्रकाशनावेळी काढले.

उल्हासनगर येथील श्री कालिका कला मंडळाच्या सभागृहात  ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या हार-प्रहार व शिक्षक तथा माजी नगरसेवक शांताराम निकम यांच्या कडु डोस या दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात व रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ  कवी व साहित्यिक अरूण म्हात्रे यांचा 'कवितेच्या गावी जावे', हा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. तत्पूर्वी उल्हासनगरच्या सुवर्ण कन्या रिद्धी व सिद्धी यांनी आपले शास्रीय गायन सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डाॅ. बाळासाहेब लबडे हे दिलीप मालवणकर यांच्या हार- प्रहार लेखसंग्रहाचा आढावा घेताना म्हणाले की, मालवणकर यांचे हे पाचवे पुस्तक असून या संग्रहात विविध प्रकारचे लेख आहेत.हे लेख सामाजिक, राजकीय, प्रबोधनात्मक व भ्रष्ट व अपप्रवृत्तीवर प्रहार करणारे आहेत. लेखसंग्रहाची नावे हार-प्रहार आणि कडू-डोस आहेत. मांडणी आणि नावावरूनच लेखसंग्रह वाचून काढण्याची इच्छा होते. अस मत उपस्थित व्यक्त करत होते.

या प्रकाशन समारंभास राजा आदाटे, साहित्यिक  व कामगार नेते श्याम गायकवाड, समीक्षक व साहित्यिक प्रा.डाॅ.बाळासाहेब लबडे, दै.युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे, दै. जनमतचे संपादक तुषार राजे, ज्येष्ठ  कवी अरूण म्हात्रे, कामगार शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मोरे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक नाना पवार, नगरसेवक भगवान भालेराव, सुरेंद्र सावंत, माजी नगरसेवक प्रकाश महाडिक,मनसेचे शहर प्रमुख बंडु देशमुख, अभिनेत्री अनिता पोतदार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

loading image
go to top