esakal | मुंबईत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव, दोन हजार नव्या रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव, दोन हजार नव्या रुग्णांची भर

मुंबईत रविवारी 2,109 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,14,445 झाली आहे. रूग्णवाढीचा दर वाढून 1.09 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव, दोन हजार नव्या रुग्णांची भर

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतही पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. मुंबईत रविवारी 2,109 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,14,445 झाली आहे. रूग्णवाढीचा दर वाढून 1.09 टक्के इतका झाला आहे. मुंबईत रविवारी 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,105 वर पोहोचला आहे. मुंबईत रविवारी 2,347 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 82 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 38 जणांना दीर्घकालीन आजार होते. कालच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 31 पुरुष तर 17 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 48 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 10 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. तर 36 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.
            
काल 2,347 रुग्ण बरे झाले असून रविवारपर्यंत 1,76,017 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 64 दिवसांवर गेला आहे.  3 ऑक्टोबर पर्यंत एकूण 11, 68, 348  कोविड चाचण्या करण्यात आल्या. 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.09 इतका आहे. 

अधिक वाचाः  कोरोनामुळे आर्थिक ताण, तरीही रस्ते दुरुस्तीसाठी प्रयत्न योग्य; KDMCचा खुलासा

मुंबईत 673 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.  सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,210 असून गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 14,441 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 1,553 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

राज्यातील 13,702 नवे रूग तर 326 रूग्णांचा मृत्यू

रविवारी राज्यात 13,702 कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 14,43,409  झाली आहे. राज्यात रविवारी एकूण 2,55,281 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल 326 मृत्यू झाले आहेत. 
राज्यात काल दिवसभरात 15,048 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 11,49,603 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. रूग्ण बरे होण्याचा दर हा 79.64 इतका आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

हेही वाचाः  कोरोना धोक्याची पातळी ओलांडतोय; 0 ते 10 वयोगटातील 51 हजार मुले कोरोनाबाधित
 
काल राज्यात दिवसभरात 326 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 38,084 वर पोहोचला आहे. काल नोंद झालेल्या 326 मृत्यूंपैकी 214 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 55 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 57 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. रविवारपर्यंत तपासण्यात आलेल्या 71,11,204 नमुन्यांपैकी 14,43,409 ( 20.29 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22,09,696 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,939 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Two thousand new corona patients in Mumbai on Sunday

loading image
go to top