वेश्याव्यवसायासाठी मुली पाठवणाऱ्या दोन महिलांना मुंबई विमानतळावरून अटक

गोव्याला जाताना सोबती म्हणून मुली पाठवण्यात येत होत्या.
Sex racket.jpg
Sex racket.jpgSex racket.jpg

मुंबई: गोव्याला (goa) जाताना सोबती म्हणून मुली पुरवणाऱ्या दोन महिला दलालांना (women) गुन्हे शाखेच्या (crime branch) पोलिसांनी देशांतर्गत विमानतळावरून (airport) अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन तरूणींची सुटका करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अबरून अमजद खान ऊर्फ सारा (४०) व वर्षा दयालाल परमार (२५) या दोघींना मंगळवारी देशांतर्गत विमानतळाच्या प्रवेशद्वारावर अटक करण्यात आली आहे.

मुंबईत वेश्याव्यवसायावर कारवाई होत असल्यामुळे ग्राहकांबरोबर मुलींना गोव्यात पाठवणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांना मिळाली होती.

Sex racket.jpg
आई कुठे काय करते: अरुंधतीच्या आयुष्यात होणार 'या' खास व्यक्तीची एण्ट्री

त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक तयार केले. त्यांच्यामार्फत महिला दलालांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी मुंबईत वेश्या व्यवसायावर कारवाई होत असल्यामुळे मुली गोव्याला येण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

Sex racket.jpg
Share मार्केट मंगळवारी डाऊन! बाजारात आज कोणते शेअर्स मिळवून देतील फायदा?

पोलिसांनी पाठवलेल्या ग्राहकांनी त्याला होकार दिला असता महिला दलालाने ४० हजार रुपये दलाली व मुलीचे ५० हजार रुपये इतक्या रक्कमेची मागणी केली. दोन मुलींसाठी आगाऊ २० हजार रुपये विमानतळावर स्वीकारण्यासही होकार दिला. दूरध्वनीवर सर्व ठरल्यानंतर दोन पीडित मुलींना घेऊन खान व परमार सोमवारी सांताक्रुझ येथील देशांतर्गत विमानतळावर आल्या असताना त्यांना ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com