आयआयटी पवईत कामादरम्यान मार्बलच्या लाद्या अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू

निलेश मोरे
Sunday, 30 August 2020

पवई आयआयटी, सभागृहाचे काम कॉन्ट्रॅक्ट हे महिंद्रा इन्फ्रास्ट्रुचर कंपनीला दिले असून त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर केशव कुमार असोसिएटच्या माध्यमातून काम चालू केले आहे.

घाटकोपर : पवई आयआयटी येथे इटालियन मार्बलचा ट्रक खाली करताना अचानक मार्बलचा लाद्या घसरल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ट्रक रिकामा करताना माल उचलणाऱ्या तीन कामगारांच्या अंगावर या लाद्या पडल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी आहे.

हेही वाचाः  भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

पवई आयआयटी, सभागृहाचे काम कॉन्ट्रॅक्ट हे महिंद्रा इन्फ्रास्ट्रुचर कंपनीला दिले असून त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर केशव कुमार असोसिएटच्या माध्यमातून काम चालू केले आहे. रविवार दुपारी 12.30 वाजता शैलेश जे मेहता सभागृह, आयआयटी, पवई येथे इटालियन मार्बलचा ट्रक खाली करण्यात येत होता, यावेळी साधारण 6 बाय 8 फूट आकाराची व 150 किलो वजनाची टाईल्स अशा एकूण 6 टाइल्स अंगावर पडल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे.

अधिक वाचाः  काँग्रेसच्या आरोपानंतर संदीप सिंहची चौकशी होणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

यात महावीर यादव (21) आणि दिनेश जहांगीर (42) हे मयत झाले असून, हेमराज चौधरी (30) हा व्यक्ती जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर पवई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबई

(संपादन : वैभव गाटे)

two workers died after falling a marble slab in Powai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two workers died after falling a marble slab in Powai