मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन कामगार जखमी

अक्षय गायकवाड
शुक्रवार, 16 मार्च 2018

मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात दोन कामगार पडून जखमी झाले. गेले काही दिवसांपासून या परिसरात हे काम सुरु होते. यासाठी दहा ते पंधरा फुटांचा खड्डा खणण्यात आला होता. दलदलीचा भाग असल्यामुळे काम करत असलेले दोन कामगार त्या खड्ड्यामध्ये धसत गेले.

विक्रोळी - ‌विक्रोळी टागोर नगर ग्रुप नंबर 6 या परिसरात शुक्रवारी ता. (16) पालिकेच्या सेंट्रल एजन्सी तर्फ़े सुरू असलेल्या मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात दोन कामगार पडून जखमी झाले. गेले काही दिवसांपासून या परिसरात हे काम सुरु होते. यासाठी दहा ते पंधरा फुटांचा खड्डा खणण्यात आला होता. दलदलीचा भाग असल्यामुळे काम करत असलेले दोन कामगार त्या खड्ड्यामध्ये धसत गेले. यामुळे ते 15 फूट आत अडकले गेले. दुपारी 12 चा सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी काम करताना काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु काम सुरू असताना सुरक्षेचे कुठली उपाययोजना न केल्याने कामगारसोबत नागरिकाचा जीव पालिका प्रशासन धोक्यात घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 3 तासाचा अथक प्रयत्नानंतर जे सीबी आणि क्रेनच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी या कामगाराना सुखरूप बाहेर काढले. जखमी दोन्ही कामगारांना पुढील उपचारासाठी पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Two workers injured in pothole mumbai