Mon, Jan 30, 2023

Accident News : वेगवान दुचाकीची टँकरला धडक; अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
Published on : 25 December 2022, 2:52 pm
मुंबई : मुंबईतील मालाड भागात वेगवान मोटरबाईकची ट्रकला धडक दिल्याने अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी कांचपाडा मालाड पश्चिमेकडील रामचंद्र एक्स्टेंशन रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.मालाड पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब शताब्दी रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुचाकी चालक आणि सहप्रवाश्याने कोणीही हेल्मेट घातलेले नसल्याचे पोलीस तपासादरम्यानसमोर आले आहे. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत असल्याची माहिती मिळत आहे.