
मुंबई : राज्य सरकार मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी ओळख दृढ करण्यासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेण्यात येणार असून, त्या ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ स्थापन होणार असल्याची माहिती मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.