उदयनराजे सिल्व्हर ओकवर, मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला

उदयनराजे सिल्व्हर ओकवर, मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला

मुंबई: भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं समजतं आहे. 

उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजे सिल्व्हर ओकवर 

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवास स्थानी उदयन राजे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेऊन उदयन राजे सिल्व्हर ओकवर आले होते. शरद पवार आणि उदयन राजे यांच्यात अर्धातास चर्चा झाली. मात्र पवारांच्या भेटीनंतर उदयन राजे यांनी बाईट देण्यास नकार दिला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. 

Udayan Raje met Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com