उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावं : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत ठेवला. 

मुंबई : उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत ठेवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.

अखेर युतीचे ठरले?; सेनेला मिळणार एवढ्या जागा

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्या पृथ्वीराज यांच्याशीही बोलल्या. आपण म्हणाल ते मान्य असतेच पण कराडमधील कार्यकर्त्यांशी या विषयी बोलणे उचित होईल असे चव्हाणांनी सोनिया गांधी यांना सांगितल्याचे समजते. ही विनंती मॅडमने मान्य केल्यानंतर रात्री उशीरा पृथ्वीराज चव्हाण मुंबईत परतले. काही महिन्यांपूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे परस्परांशी संबंध उत्तम नव्हते असे सांगितले जाईल. त्यामुळेच दोन्ही पक्ष परस्परांना किती मदत करतात याबद्दल शंका आहे. त्यामुळेच पवारांनी या मतदारसंघासाठी तीन नावे चर्चेत आहेत असे सांगितले. चव्हाण हो म्हणतील काय याबद्दल शंका असल्याने ही संदिग्धता ठेवली गेली असावी. चव्हाण यांनाही त्यामुळेच वेळ हवा आहे.

पवारांची कौटुंबिक बैठक सुरु; 19 तासांनंतर अजित पवार आले समोर

श्रीनिवास पाटील यांना तब्येतीमुळे लढणे शक्य नाही. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट आल्याने त्यांना हरवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना मदत केली जाईल असे काँग्रेसला वाटते. दक्षिण कराडच्या कार्यकर्त्यांशी यासंबंधात आज उद्यात चर्चा करणे म्हणजे त्यांना लढण्यास सज्ज व्हा असे सांगणे असावे असे मानले जाते. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे नव्याने भाजप, शंभूराज देसाई सेना स्वत: चव्हाण काँग्रेस शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील मकरंद पाटील असे राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. मोदी उदयनराजेंची लोकप्रियता विरुध्द राष्ट्रवादीचे संघटन अशी ही निवडणूक होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje bhosle should elect vidhansabha from satara says sharad pawar