Dasara Melava: आमदार अपात्रतेचा निकाल 50 वर्षांनी लावा, पण...; उद्धव ठाकरेंनी केलं सरकारला आव्हान

Uddhav Thackeray Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara Melava
Updated on

मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शीवतीर्थावर जमा झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणावरही भाष्य केलं. निकाल कधी लावायचो तो लावा, अशी उद्दिग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अपात्रतेचा निर्णय केव्हा लावायचाय तेव्हा लावा, २० वर्षे किंवा ५० वर्षांनंतर लावा. पण, संपूर्ण जग पाहत आहे. केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे जग पाहत नाहीये. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे का नाही? आंबेडकरांच्या संविधानाचं अस्तित्व राहणार आहे का नाही? असा सवाल त्यांनी केला.

हे निर्लज्जम सदा सुखी आहेत. न्यायालयाने त्यांच्या कानफाटात मारली तरी ते गाल चोळत म्हणताहेत की आम्ही टाईमटेबल सादर करु. तारखेवरती तारीख दिली जात आहे. तुम्ही तुमचं टाईमटेबल जेव्हा द्यायचं तेव्हा द्या. एक वर्ष होऊन गेलं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, असं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Dasara Melava
Dasara Melava: शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जळगाव स्पेशल शेवभाजी, खुद्द मंत्री महोदयांचा स्वयंपाकाला हातभार

अनेक क्रांतिकाऱ्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन भारतमातेला मुक्त केलं. त्या भारतमातेची लोकशाही टिकणार आहे की नाही, याच्याकडे आमचे लक्ष आहे. ३० तारखेला काय होतंय बघायचं आहे. अपात्र कोणाला ठरवणार, जनतेने आधीच ठरवून ठाकलं आहे. प्रकरणाचा निकाल लावण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा. जनता ठरवेल ते पात्र की अपात्र आहेत, असं आव्हान त्यांनी सरकारला केलं. तरी सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत, असंही ते म्हणाले

Uddhav Thackeray Dasara Melava
Dasara Melava 2023 : एकीकडे अडीच लाख वडापाव तर दुसरीकडे घरची भाकर; कथा दोन्ही दसरा मेळाव्याची

उद्धव ठाकरे यांनी एक विनोद याठिकाणी सांगितला. एक २० वर्षाच्या मुलीची छेड काढल्याचे प्रकरण कोर्टासमोर आले होते. यावेळी आरोपी म्हणून एक म्हातारा न्यायमूर्तींसमोर आला. न्यायमूर्ती म्हणाले तुम्हाला लाज वाटत नाही २० वर्षाच्या मुलीची छेड काढायला. यावेळी तो म्हातारा म्हणतो, मी देखील त्यावेळी २० वर्षांचा होतं. अशाप्रकारची स्थिती आहे. असं म्हणत त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर मिश्किल टिप्पणी केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com