
मुंबई: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी आघाडीने निवडणूक आयोग आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवर खापर फोडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरु राहिली.त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची कबुली शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.