

Uddhav Thackeray Raj Thackeray alliance
ESakal
डोंबिवली : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या ऐतिहासिक घडामोडीचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गणेश मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा देत आणि भगवे ध्वज फडकावत भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.