esakal | Virar Hospital Fire:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray

Virar Hospital Fire: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मृतांना मदत जाहीर

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. या आगीत १३ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यांशी बातचीत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवून आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: Virar Hospital Fire: राज ठाकरे म्हणाले, ''ही घटना दुर्देवी आणि क्लेशदायक''

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

uddhav thackeray announces 5 lakh Virar Hospital fire victims one lakh injured