esakal | उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर शेतकऱ्यांसाठी येणार गोड बातमी ?
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर शेतकऱ्यांसाठी येणार गोड बातमी ?

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर शेतकऱ्यांसाठी येणार गोड बातमी ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीला गोड बातमी मिळालीये. अशातच उद्धव ठाकरे यांनी आता सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलावालीये. उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची ही पहिलीवहिली बैठक आहे. या बैठकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय.

किमान समान कार्यक्रमांत काय आहे शेतकऱ्यांसाठी ? 

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दाबला गेलाय. त्याला बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शेतकर्यांना तातडीने कर्जमाफी देणार आहे. शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून आवश्यक उपाययोजना  राबवल्या जाणार आहेत. अवकाळी पाऊस आणि पुराने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. अशात अवकाळी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना मदत करणार. याचसोबत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरु आहे, अशात शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.  

उद्धव ठाकरे नतमस्तक

दरम्यान, शिवाजी पार्क पुन्हा एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 70 हजार लोकांच्या साक्षीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगवा सदरा परिधान करून साडेसहाच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरच्या व्यासपीठावर दाखल झाले. उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे संपूर्ण जनसमुदायासमोर नतमस्तक झाले. डोळ्यांचं पारणं फेडणारा असाच हा क्षण होता. 

uddhav thackeray called his first cabinet meeting after oath taking ceremony

loading image