बंडखोरांनी सरकारचा पाठिंबा काढताच ठाकरेंचा दणका, खात्यांचं फेरवाटप

Eknath shinde vs Uddhav Thackeray
Eknath shinde vs Uddhav Thackeraysakal

एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला गोंधळ या सगळ्याची चर्चा आता देशभरात होत आहे. शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठा धक्का पक्षाला बसला आहे. यामुळे सेनेसोबतच पर्यायाने महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. यानंतरच सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने देशभरात बैठका सुरू आहेत. (Maharashtra Politics)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या परतीचे दोर कापल्याचं स्पष्ट झालंय. सध्या उद्धव ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे सर्व मंत्री गुवाहाटीत आहेत. आदित्य ठाकरे वगळता सर्व मंत्री आसाममध्ये पोहोचले आहोत. (Eknath Shinde) या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट दणका दिलाय. ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांची खाती काढून घेतली असून मंत्रीमंडळाचं फेरवाटप केलं आहे. या खात्यांचा तात्पुरता कार्यभार नव्या मंत्र्यांवर सोपवला आहे.

Eknath shinde vs Uddhav Thackeray
बंडखोर पुन्हा 'मातोश्री'च्या संपर्कात, दुसऱ्या पक्षात जाण्यारून मतभेद कायम
  • गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री) - अनिल परब

  • एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री) - सुभाष देसाई

  • दादा भुसे (कृषी मंत्री) - शंकरराव गडाख

  • अब्दुल सत्तार (राज्यमंत्री, महसूल, ग्राविकास, बंदरे, खार जमिनी विकास) - प्राजक्त तनपुरे

  • उदय सामंत (उच्च तंत्र शिक्षण मंत्री) - आदित्य ठाकरे

  • राजेंद्र पाटील यड्रावरकर (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य) - सुभाष देसाई

  • बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण) - आदिती तटकरे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपातील बदल

  1. शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

  2. राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

  3. अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

  4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती आदिती सुनिल तटकरे, - राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com