भाजपा हिंदुत्त्ववादी पक्ष, हाच मोठा फेक नरेटीव्ह आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गच्चीत काठ्या घेऊन बसणारे लोक आज देश चालवत आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. मुंबईतील पक्षाच्या शिबिरात बोलताना त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.