राज्यसभा निवडणूक : 'कुणालाही घाबरायचं नाही जुमानायचं नाही'

Udhav Thakare.jpg
Udhav Thakare.jpgSakal

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी राज्यातील घडामोडींना वेग आला असून, आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांमध्ये महत्तपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करत कुणालाही घाबरायचं नाही जुमानयचं नाही असा सल्ला दिला आहे. तुम्हाला घाबरवण्याचे धमकावण्याचे प्रयत्न होतील मात्र, कुणालाही घाबरायचं नाही जुमानायचं नाही मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असे उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व आमदारांना यावेळी सांगितले. (Shivsena MLA Meeting With CM Uddhav Thackeray)

Udhav Thakare.jpg
राज्यसभा निवडणूक : अनिल देशमुख मतदानासाठी अर्ज करणार, मलिकांचे अनिश्चित

दरम्यान, वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीमध्ये शिवसेना समर्थक मविआमधील समर्थक अपक्ष आमदारदेखील उपस्थित असल्याचे शिवसेनेच्या काही आमदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना राज्यसभेवर पाठवायचं आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

Udhav Thakare.jpg
सेनेची ताकद वाढली; संजय पवार पोचले थेट CM ठाकरेंच्या 'गुडबुक'मध्ये

कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई लढायची असून, आगामी काळातील निवडणुकादेखील याच ताकतीने लढायच्या आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितले. बघता बघाता सत्तेत येऊन अडीच वर्षांचा काळ पूर्ण झाला असून, पुढील अडीच वर्षेदेखील आपलीच असल्याचे ठाकरे म्हणाले.

Udhav Thakare.jpg
त्यांचे घोडे त्यांच्या बाजारात; बैठकीनंतर राऊतांचे विधान

बैठकीनंतर सर्व आमदार हॉटेलकडे रवाना

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान पर पडणार आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर सर्व आमदार बसमधून मालाड येथील रिट्रिट हॉटेल येथे रवाना झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीत आपल्याला जिंकायचं आहे. कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचं आहे असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com