सेनेची ताकद वाढली; संजय पवार पोचले थेट CM ठाकरेंच्या 'गुडबुक'मध्ये

शिवसेनेने कोल्हापुरातच ही उमेदवारी द्यायचे ठरवून संजय पवार यांचे नाव पुढं आणलंय
Shivsena Political News
Shivsena Political Newsgoogle
Summary

शिवसेनेने कोल्हापुरातच ही उमेदवारी द्यायचे ठरवून संजय पवार यांचे नाव पुढं आणलंय

कोल्हापूर - गावच्या सोसायटीपासून ते लोकसभेपर्यंत एकीकडे घराणेशाही आणि प्रस्थापितांनाच संधी दिली जात असताना राज्यसभेसारख्या देश पातळीवरील सर्वोच्च सभागृहात संजय पवार यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देऊन शिवसेनेने कार्यकर्त्याचे सोने केले आहे. संजय पवार यांना मिळालेल्या संधीमुळे जिल्ह्यातील सेनेची (Shivsena) ताकद तर वाढणारच आहे; पण पवार (Sanjay Pawar) हे थेट पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘गुडबुक’मध्ये पोचल्याने जिल्ह्यातील पक्षांतर्गत बंडखोरीलाही चाप लागणार आहे. (Shivsena Political News Kolhapur)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. (Rajya Sabha Election 2022) भाजपला दोन तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय निश्‍चित आहे. तरीही महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi Govt) ४३ मते शिल्लक राहतात. त्या जोरावर शिवसेनेला ही सहावी जागा मिळाली आहे. या जागेवर सुरुवातीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांना संधी देण्यात येणार होती, त्यासाठी त्यांना पक्षात येण्याची अट घालण्यात आली. ही अट संभाजीराजे यांनी अमान्य केल्याने शिवसेनेने कोल्हापुरातच (Kolhapur) ही उमेदवारी द्यायचे ठरवून गेली ३० वर्षे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेल्या संजय पवार यांचे नाव पुढे आणले.

Shivsena Political News
सेनेतले अंतर्गत वाद चव्हाट्यावर; खासदाराची CM ठाकरेंवर वादग्रस्त शब्दांत टीका

सुरुवातीला हा दबाव तंत्राचा भाग वाटला; पण संजय पवार यांच्यासह सेनेचे दुसरे उमेदवार खासदार संजय राऊत यांनी ‘महाविकास’च्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केल्याने पवार यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अलीकडच्या राजकारणात सोसायटी असो किंवा गोकुळ, जिल्हा बँक यांसारख्या जिल्हास्तरावर काम करणाऱ्या संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेतही उमेदवारी देताना घराणेशाही, प्रस्थापित कुटुंबाचा विचार होत असताना शिवसेनेने मात्र एका निष्ठावंताला संधी देऊन कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान राखला आहे.

संभाजीराजे यांच्या नकारानंतर राज्यात शिवसेनेकडे अनेक दिग्गज नेते असताना संजय पवार यांचे नाव अचानक पुढे आले. त्यामुळे सेनेतच नव्हे तर इतर पक्षांतील दिग्गजांचेही डोळे विस्फारले. गेली अनेक वर्षे राजकारण करणाऱ्या इतर पक्षांनाही श्री. पवार यांच्या उमेदवारीने धडा मिळाला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे सहा आमदार होते, पण २०१९ मध्ये यापैकी पाच जणांचा पराभव झाला.

Shivsena Political News
नवनीत राणा प्रकरणी दिल्लीत हालचालींना वेग, महाराष्ट्रातील ४ बडे अधिकारी रडारवर

कोल्हापूर उत्तरच्या पराभवामागे भाजपचा जसा हात असल्याचा आरोप होतो, तसाच सेनेतील अंतर्गत नाराजीही कारणीभूत होती. संजय पवार यांच्या खासदारकीमुळे आता अशा अंतर्गत नाराजीला पक्षात थारा रहाणार नाही. कारण, या निवडणुकीच्या निमित्ताने पवार पूर्वीपेक्षा आता श्री. ठाकरे आणि ‘मातोश्री’च्या जवळ पोचले आहेत. बंडखोरी करणाऱ्यांना ते या माध्यमातून सरळ करू शकतात, हा संदेशही यानिमित्त गेला आहे.

सेनेचा तिसरा खासदार

जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार विजयी झाले आहेत. श्री. पवार यांची निवड झाल्यास सेनेचा तिसरा खासदार होणार आहे. यातून जिल्ह्यातील पक्षाची ताकद वाढविण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती होणार, हे काळच ठरवेल. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र, यावर सेनेचे यश अवलंबून आहे.

Shivsena Political News
मान्सूनचा लपंडाव सुरुच; पुन्हा तारीख बदलली, 'या' दिवशी महाराष्ट्रात धडकणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com