मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि सरकारच्या विरोधी धोरणांविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाने राज्यभरात जोर धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेचा शासन निर्णय (जीआर) रद्द केल्यानंतर ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर बाईक रॅली काढत जोरदार जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, बँजो वाजवला आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली ठाम भूमिका मांडत सरकारवर हल्लाबोल केला.