

Vishakha Raut caste certificate cancellation
ESakal
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असून, नियमानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा विषय मुंबई महापालिकेच्या सभागृहासमोर आलेला नसल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.