
Uddhav-Raj Thackeray Meet
esakal
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईतील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतिर्थ’ येथे पार पडली. गणेशोत्सवानंतरची ही दुसरी भेट असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.