
डोंबिवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. पलावा पुलाच्या प्रश्नाला हात घालत स्थानिक प्रश्नांवर आम्ही एकत्र आल्याचे स्थानिक नेते मंडळी सांगत आहेत.