
मुंबई : ‘‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याद्वारे देशातील विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं स्वप्न भाजप पाहत आहे. लोकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकाले तर तुरुंग कमी पडतील, परंतु आमचा आवाज दबणार नाही. जनसुरक्षा कायद्याविरोधात एकजुटीने सरकारला गुडघ्यावर आणावे लागेल,’’ असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.