
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज पुन्हा एकदा चर्चेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन बी. रेड्डी यांनी आज मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी रेड्डी यांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले. या भेटीने उपराष्ट्रपती निवडणुकीच्या रणधुमाळीला नवे वळण मिळाले आहे.