Uddhav Thackeray: इतिहासात पहिल्यादांच, ठाकरेंनी दिले 'पंजा'ला मत? राज्यभर चर्चा

Mumbai North Central Constituency : यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे.
Uddhav Thackeray with his family
Uddhav ThackeraySakal

Mumbai Lok Sabha Elections 2024 Live Updates: यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय खास आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल आपण पाहू शकत आहोत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभवत आहे. यातच यंदा इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कोणीतरी जाहीरपणे काँग्रेसला मतदान केल्या असल्याची चर्चा आहे.(Uddhav Thackeray Shivsena)

महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान होत असून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे. (Maharashtra Loksabha 2024)

Uddhav Thackeray with his family
Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

मातोश्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये येते. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोघांचाही उमेदवार नाही.

या ठिकाणी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून भारतीय जनता पक्षाने उज्जवल निकम यांना संधी दिली आहे. अशावेळी जनता कोणाला साथ देते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. (Mumbai Loksabha Election 2024)

Uddhav Thackeray with his family
Uddhav Thackeray UNCUT : उद्धव ठाकरेंची मुंबईच्या प्रचाराची शेवटची सभा

तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून ते यंदा काँग्रेसला मतदान करतील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसच्या हाताला ठाकरेंच मत मिळाल अस चित्र आहे.

असं जरी असलं तरी दुसरीकडे दक्षिण मध्य मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंनी धनुष्यबाणाला म्हणजेच राहुल शेवाळेंना (Rahul Shewale) मतं दिले असल्याची चर्चा आहे. अशावेळी एका ठाकरेंनी धनुष्यबाणाला तर दुसऱ्या ठाकरेंनी हाताला मत दिलं असल्याचं म्हटले जात आहे. या गोष्टीची चर्चा दिवसभर मुंबई सह राज्यामध्ये पाहिला मिळाली.

Uddhav Thackeray with his family
Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com