मुख्यमंत्री ठाकरेंची संपत्ती किती...तुम्हाला माहितीये का? वाचा ही बातमी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 184 कोटी रुपयांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे 97 कोटी आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. हिदू अविभक्त कुटुंब म्हणून त्यांची एक कोटी 58 लाखांची संपत्ती आहे. ठाकरे दाम्पत्याकडे स्वत:चे वाहन नाही. रश्मी ठाकरे व्यावसायिक आणि उद्धव ठाकरे नोकरदार आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 184 कोटी रुपयांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे 97 कोटी आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. हिदू अविभक्त कुटुंब म्हणून त्यांची एक कोटी 58 लाखांची संपत्ती आहे. ठाकरे दाम्पत्याकडे स्वत:चे वाहन नाही. रश्मी ठाकरे व्यावसायिक आणि उद्धव ठाकरे नोकरदार आहेत.

ही बातमी वाचली का? ...तर साडेसहा लाख नागरिकांचे जीव वाचवता येतील! दिल्ली आयआयटीचा अहवाल

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांना संपत्तीचे प्रतिज्ञापत्रही जोडले आहे. वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाची 50 टक्के मालकी उद्धव ठाकरे आणि 50 टक्के मालकी रश्मी ठाकरे यांची आहे. जवळील एका बंगल्याची 75 टक्के मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील शेतजमीन आणि अकोले येथील भूखंडाचा त्यांच्या मालमत्तांमध्ये समावेश आहे.

ही बातमी वाचली का? मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार; राज्य सरकारचा निर्णय

उद्धव ठाकरे यांची चल-अचल मिळून 97 कोटी 50 लाखांची संपत्ती आहे. रश्मी ठाकरे यांची 85 कोटी 9 लाख रुपयांची संपत्ती आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून त्यांच्याकडे एक कोटी 58 लाखांची संपत्ती आहे. वेतन, व्याज, लाभांश आणि भांडवली उत्पन्न असे उत्पन्नाचे स्रोत असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे.

15 कोटींचे कर्ज
उद्धव ठाकरे यांच्यावर 4 कोटी 6 लाखांचे, तर रश्मी ठाकरे यांच्यावर 11 कोटी 44 लाखांचे कर्ज आहे.

ही बातमी वाचली का? मटाकाकिंग रतन खत्रीचे निधन

नोटाबंदीचा फटका 
नोटाबंदीचा फटका उद्धव ठाकरे यांनाही बसल्याचे चित्र या प्रतिज्ञापत्रात दिसत आहे. 8 नोव्हेबर 2016 रोजी नोटाबंदी झाली. त्या आर्थिक वर्षात ठाकरे यांचे उत्पन्न 20 लाख 63 हजार रुपये होते. ते 2017-18 मध्ये 4 लाख 36 हजार रुपये झाले. 2018-19 मध्ये त्यांचे उत्पन्न 32 लाख 58 हजार रुपये होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray is worth Rs 184 crore nomination for the Legislative Council elections on Monday