esakal | शपथविधीनंतर राज आणि उद्धव ठाकरेंची गळाभेट
sakal

बोलून बातमी शोधा

शपथविधीनंतर राज आणि उद्धव ठाकरेंची गळाभेट

महाराष्ट्रात राजकारामामुळे अनेक नाती दुरावली आहेत. अशातच राजकारण वेगळं आणि कुटूंब वेगळं हे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय

शपथविधीनंतर राज आणि उद्धव ठाकरेंची गळाभेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात राजकारामामुळे अनेक नाती दुरावली आहेत. अशातच राजकारण वेगळं आणि कुटूंब वेगळं हे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय. उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी स्वतः  जातीने उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून निमंत्रण दिलं होतं. दिलेलं निमंत्रण स्वीकारत आई आणि मुलगा अमित सोबत राज ठाकरे यांनी भाऊ उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला हजेरी लावली. 

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी देखील शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघा ठाकरे भावांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिल्यावर राज ठाकरे यांच्या आईंच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं.

लगेचच पहिली मंत्रिमंडळ बैठक : 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोराथ, डॉक्टर नितीन राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान शपथ घेतल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय निर्णय घेतला जातोय, हे पाहणं अत्य्नात महत्त्वाचं असणार आहे.    

WebTitle : Udhav Thackeray and raaj thackeray hugs each other after uddhav thackeray takes oath as CM of maharashtra