उद्धव ठाकरेंनी तयार केलाय चौथ्या लॉकडाऊनचा संपूर्ण प्लॅन, राजेश टोपे म्हणतायत...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनसाठी संपूर्ण प्लॅन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई: सध्या कोरोनामुळे देशावर महाभयंकर महामारीचं संकट ओढावलं आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ७८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर २५०० पेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी पहिल्या तीन लॉकडाऊननंतर आता चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रात या चौथ्या लॉकडाऊनसाठी संपूर्ण प्लॅन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या ररुग्णांचा आकडा तब्बल २५ हजारच्या पार पोहोचला आहे तर ९७५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. घराच्या बाहेर निघू नका, सोशल डिस्टंसिंगचं पालन करा असं सांगण्यात आलं असूनही लोकं ऐकत नसल्यामुळे सरकारवर चौथं लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा: अखेर ठरलं ! 'या' दिवशी उद्धव ठाकरे घेणार आमदारकीची शपथ...

चौथा लॉकडाऊनकसा असेल आणि त्याचं स्वरूप काय असेल या संबंधीचा पूर्ण प्लॅन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केला आहे आणि हा प्लॅन ते केंद्र सरकारपुढे मांडणार आहेत शी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 

राज्यात मृत्युदर आहे आटोक्यात:

"राज्यात मृत्युदर आटोक्यात आहे आणि यामध्ये महत्वाचं योगदान 'आयुष' विभागाचं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्या पॅथीचा उपयोग केला जाईल याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. मात्र जनतेनं सतर्क आणि सुरक्षित राहणं महत्वाचं आहे," असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटल आहे. 

हेही वाचा:भीषण !  येत्या सहा महिन्यात तब्बल सहा लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता.... 

कोरोनासोबत जगण्याची तयारी करावी लागणार:

"राज्यातल्या जनतेनं लॉकडाऊन रिलीज प्रोटोकॉलचा अवलंब करणं आवश्यक आहे. सध्या नागरिक आपल्या गावी जात आहेत त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय करावी लागणार आहे. हॉटस्पॉट सोडल्यास इतर सर्व ठिकाणं काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. मात्र इथेही आपल्याला स्वच्छतेचं पालन करणं महत्वाचं असणार आहे", असंही राजेश टोपे यांनी म्हंटलंय. 

udhhav thackeray has made all plans of lockdown four said rajesh tope read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udhhav thackeray has made all plans of lockdown four said rajesh tope read full story