Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांची राजकारणात एन्ट्री

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश केला असून, भारतीय जनता पक्षाकडून ते उत्तर-मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
Ujjwal Nikam
Ujjwal Nikamsakal

मुंबई : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश केला असून, भारतीय जनता पक्षाकडून ते उत्तर-मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. मावळत्या खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीला कात्री लावण्यात आली आहे.

आता येथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात लढत होईल. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान उज्ज्वल निकम हे राजकारणात येणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती.

Ujjwal Nikam
Devendra Fadnavis : भारतासाठी भाजपला मतदान करा ; विकासाचा मार्ग मोकळा करा

आता उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार भाजपने घोषित केला असला तरी महायुतीमध्ये ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com