Ulhasnagar News: जमिनीवर झोपवून रुग्णांवर उपचार, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे विदारक वास्तव

Ulhasnagar Central Hospital: उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात विदारक परिस्थिती असून येथे जमिनीवर झोपवून रुग्णांवर उपचार घेतले जात असून बाळंत महिलांच्या बेडखाली आणि आजूबाजूला कचरा असल्याचे वास्तव समोर आले आहे.
Ulhasnagar Central Hospital

Ulhasnagar Central Hospital

ESakal

Updated on

उल्हासनगर : येथील मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना चक्क जमिनीवर झोपवून उपचार घ्यावे लागत आहेत, तर गंभीर बाब म्हणजे नवजात बालक आणि मातांच्या प्रसूतिगृहात बेडखाली कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. एकीकडे आरोग्यमंत्री आणि खासदारांकडून शासकीय रुग्णालयाची पाहणी, सुविधांचा आढावा आणि आरोग्यसेवा सुधारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र रंगवले जात आहे, मात्र उल्हासनगरमध्ये या उलट चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com