esakal | उल्हासनगरात भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
sakal

बोलून बातमी शोधा

Injured Woman

उल्हासनगरात भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : स्कुटीवरून कामाला जाणाऱ्या उल्हासनगरातील (ulhasnagar) महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला (Dog attack) केला आहे. या महिलेच्या पायाचे अनेक ठिकाणी लचके तोडले आहेत. स्वतःचा बचाव करताना महिलेची स्कुटी पडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद (CCTV Footage) झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: कासा : ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त पथनाट्यातून जनजागृती

कॅम्प नंबर 5 गांधीरोड परिसरात बॅरेक नंबर 1724 मध्ये सोनी देशमुख ही महिला राहते.रविवारी सकाळी त्या स्कुटीवरून कामाला जात होत्या.का ही अंतरावर त्यांच्या स्कुटीचा पाठलाग करणाऱ्या भटक्या कुत्र्याने सोनी देशमुख यांच्या पायावर हल्ला करून लचके लोडण्यास सुरवात केली. त्यांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून पायाचा बचाव करताना त्यांची स्कुटी पडली.ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

नागरिकांनी धाव घेतल्यावर कुत्र्याने पळ काढला.सोनी देशमुख यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना रेबीजच इंजेक्शन देऊन व प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले. गांधीरोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकदा इथून ये जा करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत.या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी सोनी देशमुख,त्यांचे पती यांनी केली आहे. याबाबत पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पगारे,डॉ.राजा रिजवानी यांच्याशी विचारणा केली असता, भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी कुणी संस्था पुढे येत नाही. निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top