esakal | जामीनाचे समर्थन करणाऱ्या आईला विशेष पौस्को न्यायालयाने फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

जामीनाचे समर्थन करणाऱ्या आईला विशेष पौस्को न्यायालयाने फटकारले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वतःच्या अल्पवयीन मुलाचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट (Post) करणार्या आरोपींच्या जामीनाचे समर्थन करणाऱ्या आईला विशेष पौस्को न्यायालयाने (Court) फटकारले आहे. पोलीस (Police) आणि न्यायालयाच्या (Court) वेळेचा अपव्यय करून तक्रारदार आईने आरोपींच्या जामिनाची मागणी केल्याबद्दल न्यायालयाने आईलाच पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.

स्वतःच्या बारा वर्षाच्या मुलाचे विवस्त्र व्हिडीओ चित्रित करून तीन युवकांनी ते सोशल मीडियावर पोस्ट केले, अशी तक्रार आईने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी तीनही युवकांना भादंवि, पौस्को आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अटक केली होती. तीनही आरोपी युवकांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जामध्ये तक्रारदार आईने प्रतिज्ञापत्र दाखल करुन तिघांना जामीन मंजूर करण्यास हरकत नाही, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने या प्रतिज्ञापत्राची गंभीर दखल घेतली. बारा वर्षाच्या मुलाबरोबर आरोपींनी केलेले क्रुत्य गंभीर आणि घ्रुणास्पद आहे.

याची तक्रार आईनेच केली आहे. पण आता आई आणि मुलगा जे या खटल्यात प्रमुख साक्षीदार आहेत तेच आरोपींच्या सुटकेसाठी प्रतिज्ञापत्र करत आहेत. न्यायालय आणि पोलीस यंत्रणेचा अपव्यय करण्याचा हा प्रकार आहे, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली आहे. न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला असून हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुलाच्या निवास आणि शाळेच्या परिसरात फिरु नये असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत पिडीत मुलाची आई दंडाची रक्कम जमा करत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन मंजूर होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावले आहे.

हेही वाचा: औरंगाबादकडे जाणारा गुटखा पोलिसांनी पकडला

पोलिसांनी आरोपींना ता 3 रोजी अटक केले होते. आम्ही ते व्हिडीओ काढून टाकले असा खुलासा प्रारंभी आरोपींनी पोलिसांकडे केला होता. मात्र ते व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, असे तपासात उघड झाले. पोलिसांनी जामिनाला विरोध केला होता. साक्षीदारांचा जबाब नोंदविणे सुरू आहे आणि व्हिडीओ फोरेन्सिक लैबला पाठवले आहेत, असेही सरकारी वकिलांनी सांगितले. सर्व आरोपी वीस ते बत्तीस वयोगटातील आहेत.

आरोपींना जामीन मंजूर करण्यास हरकत नाही आणि जर आवश्यकता नसेल तर त्यांचा ताबा पोलिसांना न देता जामीन मंजूर करावा, असे तक्रारदार आईने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

loading image
go to top