उल्हासनगर - आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी तीन टप्प्यातील लागू केलेली अभययोजना फळल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात उल्हासनगरात मालमत्ता कराचा 126.84 कोटींचा रेकॉर्डब्रेक वसुलीचा नवा अध्याय प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे मागील 112 कोटींचा रेकॉर्ड इतिहासजमा झाला आहे. यावेळेस नवीन 939 मालमत्तांची भर पडल्याने उत्पन्नात 6.90 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,कर विभागाच्या उपायुक्त विशाखा मोटघरे, सहायक आयुक्त अजय साबळे, कर निर्धारक व संकलक निलम कदम आणि मालमत्ता कर विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी थकबाकीदारांच्या मालमत्ता कर वसुलीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे तसेच त्यांच्या अथक परिश्रमामुळे महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात कर जमा झाला आहे.
महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेच्या कर विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे यंदाच्या वर्षी घसघशीत यश मिळाले असून, त्यामुळे मनोबल उंचावले असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक निलम कदम यांनी दिली.
महानगरपालिका क्षेत्रात एकुण 1 लाख 36 हजार 543 रहिवासी मालमत्ताधारक आहेत. तर 47 हजार 7 वाणिज्य अशा एकुण 1 लाख 83 हजार 550 मालमत्तांचा समावेश आहे. त्यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात मागील थकबाकी पकडता रु. 951 कोटी (थकबाकी रु. 833.30 कोटी + चालु रु. 117.80) रुपये कराची मागणी होती. त्यानुसार 31 मार्च पर्यंत पालिकेच्या तिजोरीत 126,84,87,418 रुपयांचा कर जमा झाला असल्याचे निलम कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.