

उल्हासनगर : रात्री भररस्त्यात धारदार कैचीने करण्यात आलेल्या हत्येचा उलगडा उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांनी अवघ्या 8 तासात केला आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने केली असून याप्रकरणी आरोपी गौरव उडानशिवेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.