esakal | उल्हासनगर: ४ वर्षांचा रूद्र लघुशंकेला गेला अन् पावसाने घात केला
sakal

बोलून बातमी शोधा

Boy-Drowned

उल्हासनगर: ४ वर्षांचा रूद्र लघुशंकेला गेला अन् पावसाने घात केला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: मुसळधार पावसामुळे नदी, नाल्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र अशा वेळी लघुशंखेसाठी गेलेल्या एक 4 वर्षीय चिमुरड्याचा तोल गेल्याने तो नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात पडला अन त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिराने उल्हासनगरात घडली. त्यानंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली. (Ulhasnagar Rains Four year old drowns in nullah as rain wreaks havoc while going for pee)

हेही वाचा: 'सामना'मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"; मनसेचा टोला

रुद्र बबलू गुप्ता असं या चार वर्षांच्या मुलाचं नाव. उल्हासनगर कॅम्प ३ च्या शांतीनगर गऊबाई पाडा परिसरातील ही घटना आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारा रुद्र रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नाल्याच्या शेजारी लघुशंकेसाठी गेले होता. याच दरम्यान त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: घरातच पाण्यातून शॉक लागून महिलेचा मृत्यू, वांद्रयातील घटना

इकडे बराच वेळ झाला तरी रुद्र घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. नाल्याच्या बाहेर रुद्रची चप्पल होती. त्यामुळे तो नाल्यात पडल्याचा संशय घरच्यांना आला. अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यात शोध घेत रुद्रला बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

loading image