esakal | घरातच पाण्यातून शॉक लागून महिलेचा मृत्यू, वांद्रयातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Rains

घरातच पाण्यातून शॉक लागून महिलेचा मृत्यू, वांद्रयातील घटना

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत शनिवारी रात्री पाऊस काळरात्र बनून कोसळला. चेंबूर (chembur) भारतनगर, (bharat nagar) विक्रोळीसह (vikroli) वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अजूनही पाऊस (Mumbai rain) कोसळत असून दुर्घटनांचे सत्र थांबलेले नाही. (Women died by shock from water bandra incident dmp82)

वांद्रयात शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे रिक्लेमशन येथील ट्रान्जिस्ट कँम्पमध्ये ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे पाणी घरात शिरले. त्यावेळी विद्युत प्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे घरात असतानाच शॉक लागून फातीमा कासवाला यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: एक पावसाळी रात्र अन् होत्याचं नव्हतं झालं... गोरसे कुटुंबावर शोककळा

फातीमा शॉक लागून घरात बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना भाभा रुग्णालयात नेले. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी ही माहिती दिली.

loading image