उल्हासनगर : गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी उल्हासनगर वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या उपस्थितीत घेतलेल्या विशेष बैठकीत टेम्पो असोसिएशन्सना कडक सूचना देण्यात आल्या असून, अनंत चतुर्थीपर्यंत मोठ्या वाहनांनी शहरात लोडिंग-अनलोडिंग न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.