उल्हासनगर : शहराच्या जलसंपत्तीपासून ते रस्त्यांपर्यंतच्या समस्यांवर एकाच वेळी निर्णायक पाऊले उचलण्याचा निर्धार करण्यात आला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची विशेष भेट घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.