Ulhasngar News: ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ५ जणांची जेलमध्ये केली रवानगी! आचारसंहितेच्या काळात पोलिस अलर्ट मोडवर

Ulhasngar News: ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ५ जणांची जेलमध्ये केली रवानगी! आचारसंहितेच्या काळात पोलिस अलर्ट मोडवर

Ulhasnagar Crime: लोकसभा निवडणुकीत लागू झालेल्या आचारसंहितेत उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हकरांना टार्गेट करण्याची मोहीम सुरू केली आहे.या मोहिमे अंतर्गत 7 सावज टिपण्यात आले आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता 10 हजार रुपयांचा दंड भरू न शकणाऱ्या 7 पैकी 5 जणांची आधारवाडी रवानगी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी दिली.

Ulhasngar News: ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ५ जणांची जेलमध्ये केली रवानगी! आचारसंहितेच्या काळात पोलिस अलर्ट मोडवर
Ulhasnagar : उल्हासनगरातील पप्पू कालानी हेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे प्रणेते ; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची जाहीर पोचपावती

महिनाभरापासून लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांच्या आदेशान्वये,सहायक पोलीस आयुक्त विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे,पोलीस निरीक्षक पोपट करडकर, पोलीस कर्मचारी नाना आव्हाड,भारत खांडेकर,संजय बेंद्रे,नितेश आरज यांच्या पथकाने शहरातील प्रवेशद्वारांसह मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी सुरू केली आहे.

शनिवारी व रविवारी सकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या नाकाबंदीत 7 जणांना मदधुंद अवस्थेत गाडी चालवताना ताब्यात घेण्यात आले होते.

Ulhasngar News: ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ५ जणांची जेलमध्ये केली रवानगी! आचारसंहितेच्या काळात पोलिस अलर्ट मोडवर
Mumbai Crime News: मुदतपूर्व सुटकेचा मार्ग मोकळा; कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या

नाकाबंदीत जे दारू पिऊन गाडी चालवतात त्यांच्यावर भारतीय मोटर वाहन कायद्यातील कलम 185 नुसार तर दारू पिऊन मागे बसणाऱ्याच्या विरोधात कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत आहे.

22 तारखेला या 7 जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.त्यापैकी दोघांनी दंड भरण्यास तयारी दर्शवली.तर 5 जण हा दंड भरू न शकल्याने त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे अविनाश भामरे यांनी सांगितले.

Ulhasngar News: ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ५ जणांची जेलमध्ये केली रवानगी! आचारसंहितेच्या काळात पोलिस अलर्ट मोडवर
Nashik Crime News : ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना विवाहितेवर अत्याचार; आडगाव पोलिसात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com