"जर आपण धावू शकत नाही तर आपल्या रक्ताला धावू द्या"; १५ ऑगस्ट रोजी राबवली जाणार अनोखी मोहीम

मिलिंद तांबे
Saturday, 8 August 2020

येत्या स्वात्यंत्र दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मुंबईत अल्ट्रा मॅरेथॉन रक्तदान मोहीमेच आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई :  येत्या स्वात्यंत्र दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी मुंबईत अल्ट्रा मॅरेथॉन रक्तदान मोहीमेच आयोजन करण्यात आलं आहे. टाटा मेमोरियल सेंटरकडून या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं असून अनेक धावपटू त्यात सहभागी होणार आहेत. कर्करोग्यांच्या पुढील उपचारासाठी वेळेत रक्त मिळणे महत्वाचे आहे. त्यासाठी मॅरेथॉन रक्तदान मोहिमेत आयोजन करण्यात आले आहे.

“जर आपण धावू शकत नाही तर आपल्या रक्ताला धावू द्या” असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन हे अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी करण्यासाठी मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन धावपटूंनी टीएमसीबरोबर भागीदारी केली आहे आणि सध्याच्या आव्हानात्मक काळाला संधीमध्ये बदलण्याचा हा प्रयत्न आहे. दरवर्षी धावपटू 15 ऑगस्ट रोजी मॅरेथॉन आयोजित करतात आणि टीएमसीमध्ये कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या उपचारासाठी ते समर्पित करतात. यावर्षी कोरोनामुळे मॅरेथॉनचे आयोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. 

मोठी बातमी - विमान दुर्घटनेची बातमी आली आणि साठे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली...

टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) ही देशातील सर्वात मोठ्या कर्करोग संस्थेपैकी एक आहे. दरवर्षी 70,000 पेक्षा जास्त नवीन कर्करोगाचे रुग्ण टीएमसीकडे निदान, उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येतात. योग्य आणि वेळेत उपचार केले तर कर्करोग बरा होऊ शकतो. परंतु त्यासाठी बरीच महत्वाचा काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त आणि रक्त उत्पादनांचा अविरत स्त्रोत. रक्त हा घटक ना प्रयोगशाळेत किंवा कारखान्यांमध्ये तयार केला जाऊ शकत नाही. तर तो केवळ निरोगी स्वयंसेवकांकडूनच येऊ शकतो. 

अल्ट्रा धावपटूंनी 15 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दादर, वीर सावरकर भवन येथे रक्तदान शिबिर घेण्याचे ठरविले आहे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, दिवसभर देणगी देण्यासाठी जागा नियोजित करणे, पुरेशी स्वच्छता, संरक्षणात्मक गीअरची अंमलबजावणी करणे इत्यादींसह अत्यंत काळजी व सावधगिरी बाळगण्यात येणार आहे. 

मोठी बातमी -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, 'या' यादीत मिळवलं 'टॉप 5' मध्ये स्थान...

कोणत्याही फळाची अपेक्षा न करता टीएमसी अत्यंत निष्ठेने  कार्य करीत आहे. रुग्णसेवा करून अनेकांचे जीव वाचवून माणुसकी जपण्याचे काम येथे होत असल्याची भावना डॉ. राजेंद्र बडवे, संचालक, टीएमसी यांनी व्यक्त केली.  मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन धावपटूंनी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रयत्नांच्या माध्यमातून टीएमसीला पाठिंबा दर्शविला आहे आणि यावर्षी रक्तदान करून पुन्हा एकदा त्यांनी कर्करोगाच्या अनेक रुग्णांना जीवनवाहिनी पुरविली असल्याचे डॉ. श्रीपाद बनवली, संचालक शैक्षणिक, टीएमसी यांनी म्हटले. टीएमसी येथे दूरदूरहून आलेल्या रूग्णांसाठी ही कठीण वेळ आहे. मात्र कोरोना आपल्या प्रयत्नांवर मर्यादा घालू शकते, परंतु आपल्या मानवतेवर कधीही नाही अशी भावना डॉ. सुनील राजाध्यक्ष, एचओडी, ट्रान्सफ्यूजन मेडिसिन विभाग, टीएमसी यांनी व्यक्त केली.

( संपादन - सुमित बागुल ) 

ultra marathon blood donation camp by tata center on 15 august in mumbai amid corona

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ultra marathon blood donation camp by tata center on 15 august in mumbai amid corona