अल्ट्रासाऊंडिंग पध्दतीने शोधली ब्रिटीशकालीन जलवाहिनीची गळती

अल्ट्रासाऊंडिंग पध्दतीने शोधली ब्रिटीशकालीन जलवाहिनीची गळती

मुंबई: लोअर परळ दिपक सिनेमाजवळ ब्रिटीश कालीन जलवाहिनीला गळती लागल्याने रस्ता खचला होता. मात्र ही मुख्य जलवाहिनी 25 ते 30 फूट जमिनी खाली असल्याने निश्‍चित गळती शोधण्यासाठी महानगर पालिकेने अल्ट्रासांऊडिंग पध्दतीचा वापर करुन कळती शोधून आता खोदकाम पूर्ण केले आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती महानगर पालिका बुधवार पासून सुरु होणार आहे.

सेनापती बापट मार्गावरील 1450 मिलीमिटर व्यासाच्या जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती लागली होती. 18 नोव्हेंबरला गळतीमुळे हा रस्ता खचला. रस्ता जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे खचला असला तरी गळती निश्‍चित कोठे लागली हे शोधणे जिकरीचे होते. त्यासाठी रस्ताचा मोठा भाग खोदावा लागला असता. मात्र, पालिकेच्या पथकाने खचलेला भाग खोदून अल्ट्रासांऊडिंग पध्दतीने गळतीची जागा निश्‍चित केली. गळतीची जागा निश्‍चित झाली असली तरी या जलवाहिनीच्या बाजूलाच दोन मॅनहोल्स होते. त्यामुळे त्यांच्या वाहिन्या सांभाळून हे खोदकाम करण्याचे आवाहन महापालिकेवर होते. हे दिव्य पार करत महापालिकेने खोदकाम पूर्ण केले आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी आणि गुरुवारीला होणार आहे, अशी माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली.

या जलवाहिनीची दुरुस्ती बाहेरुन करता येणार नाही. त्यासाठी जलवाहिनीत शिरुन हे काम करावे लागणार आहे. त्यामुळे हे काम अधिक आव्हानात्मक आहे. त्यासाठी पालिकेने पूर्वतयारीही पूर्ण केली आहे.

 अल्ट्रासाऊंड लिक डिटेक्‍शन करताना एका यंत्राच्या साहाय्याने ध्वनी लहरी जलवाहिनीवर सोडल्या जातात. ज्या ठिकाणी या ध्वनी लहरींची प्रखरता कमी होते. त्या ठिकाणी गळती असल्याचे समजते. त्यासाठी एक मोजमापकही ही तपासणी करणाऱ्या व्यक्तीच्या हातात असते.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ultrasound detection of British-era aqueduct leaks lower parel

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com