मोखाडा : भाजप विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश येलमामे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मोखाडा (पालघर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजप विद्यार्थी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्नी सानप यांनी पालघर जिल्हा विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश येलमामे यांची निवड केली आहे. त्यांचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेने पाठोपाठ भाजपने पालघर जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. युवा शक्तीची ताकद उभी करण्यासाठी विद्यार्थी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्नी सानप यांनी मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील उमेश येलमामे यांची विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे. आपण तळागाळातील मतदारांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवून पक्ष वाढीवर भर देणार असल्याचे उमेश येलमामे यांनी निवडीनंतर सांगितले आहे. 

Web Title: umesh yelmame elected as district president of bjp yuva morcha