
मुंबई : उच्च न्यायालयाने दादर येथील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिला आहे. महापालिकेकडून त्याबाबतची अंमलबजावणी केली जात असली तरी काही लोकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. दादरच्या जैन मंदिराशेजारील एका इमारतीच्या छतावर दाण्याची पोती टाकली जात आहेत. तेथे हजारो कबुतरे जमा होत असून, त्याचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.